मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

गळनिंब (दक्षिण) · नेवासा · अहिल्यानगर

स्थान - T:नेवासा D:अहिल्यानगर

स्थान क्र. 2 अवस्थान गळनिंब (दक्षिण)

अवस्थान स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
संभाजीनगर-नगर राज्यमार्गावर प्रवरासंगम व नेवासा फाटा दरम्यान खडका फाटा आहे. तेथून सलाबतपूर मार्गाने गळनिंब येथे जाता येते. खडका फाटा ते गळनिंब १५ कि.मी. आहे. नेवाशाहून गळनिंब (खडका फाटा, सलाबतपूर मार्गे ) २० कि.मी. आहे. नवे गळनिंब ते जुने गळनिंब २ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
कोटेश्वर (कोळेशर) येथील स्थाने - हे स्थान जुने गळनिंबच्या पूर्वेस एक कि.मी. अंतरावर गोदावरी नदीच्या दक्षिण काठी भव्य मंदिरात आहे. मंदिराच्या पायऱ्या चढून गेल्यावर उजव्या हाताला स्थान आहे.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: नेवासा | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूचे या ठिकाणी एक महिना वास्तव्य होते. (उ.ली. ३१२, स्था. पो.) येथील इतर लीळा : १) परसनायकांना स्थिती देणे. (उ. ली. ३१३) २) त्रिकाळ पूजावसर व आरोगणा येथे होत असे. अवस्थान स्थानाच्या उत्तरेचे स्थान निर्देशरहित आहे .

जवळील इतर स्थाने