स्थान - T:अहिल्यानगर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 1
अवस्थान स्थान
चिचोंडी (पाटील)
अवस्थान स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
चिचोंडी हे गाव, अहिल्यानगर-बीड मार्गावर नगरहून आग्नेयेस २० कि.मी. व आष्टीहून वायव्येस ४० कि.मी. आहे. चिचोंडीला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. केळीपिंपळगावहून दक्षिणेस चिचोंडी (केळ, दौलावडगाव मार्ग) ९ कि.मी. आहे. हा मार्ग जीप व पायी जाण्यासाठी आहे. केळीपिंपळगावहून चिचोंडी (नगरमार्ग) ४४ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान चिचोंडी गावाच्या पश्चिम विभागी मुस्लिम गल्लीत पश्चिमाभिमुख देवळात आहे. हे देऊळ महानुभाव मंदिर तथा श्रीकृष्ण मंदिर या नावाने ओळखले जाते.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात केळीपिंपळगावहून चिचोंडीला आले. त्यांचे या ठिकाणी पाच दिवस वास्तव्य होते. (उ. ली. २६६, स्था. पो.) पाच दिवसांच्या वास्तव्यानंतर ते येथून मढपिंपरीला गेले.