मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

चिचोंडी (पाटील) · अहिल्यानगर · अहिल्यानगर

स्थान - T:अहिल्यानगर D:अहिल्यानगर

स्थान क्र. 4 आडवांडी चिचोंडी (पाटील)

आडदांडीवरील स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
चिचोंडी हे गाव, अहिल्यानगर-बीड मार्गावर नगरहून आग्नेयेस २० कि.मी. व आष्टीहून वायव्येस ४० कि.मी. आहे. चिचोंडीला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. केळीपिंपळगावहून दक्षिणेस चिचोंडी (केळ, दौलावडगाव मार्ग) ९ कि.मी. आहे. हा मार्ग जीप व पायी जाण्यासाठी आहे. केळीपिंपळगावहून चिचोंडी (नगरमार्ग) ४४ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान अवस्थान मंदिराच्या पूर्वेस २९ फूट अंतरावर दक्षिणाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: अहिल्यानगर | Distt: अहिल्यानगर
पूर्वी देवळाच्या आवाराचा दरवाजा या ठिकाणी होता आणि त्या दरवाजाला आडदांडी होती. बडव्याच्या घरी गृहप्रवेशाचा कार्यक्रम झाल्यावर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे आले . आडदांडीवर लोंबता श्री चरणी आसन झाले . साधा भिक्षेहून आली. तिने सर्वज्ञांना दंडवत घातले. सर्वज्ञांच्या भाळ प्रदेशी जोंधळ्याचा टिळा लावलेला पाहून तिने विचारले, "हा जोंधळ्याचा टिळा कुणी लावला?" सर्वज्ञ म्हणाले, "बडव्याच्या येथे गृहप्रवेशाचा कार्यक्रम झाला. शेतात पुष्कळ ज्वारी पिकावी म्हणून त्याने दहीमिश्रित जोंधळ्याचा टिळा लावला आहे." (उ. ली. २६५, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने