मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

चिचोंडी (पाटील) · अहिल्यानगर · अहिल्यानगर

स्थान - T:अहिल्यानगर D:अहिल्यानगर

स्थान क्र. 5 टिळा चिचोंडी (पाटील)

दहीमिश्रित जोंधळ्याचा टिळा लावणे स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
चिचोंडी हे गाव, अहिल्यानगर-बीड मार्गावर नगरहून आग्नेयेस २० कि.मी. व आष्टीहून वायव्येस ४० कि.मी. आहे. चिचोंडीला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. केळीपिंपळगावहून दक्षिणेस चिचोंडी (केळ, दौलावडगाव मार्ग) ९ कि.मी. आहे. हा मार्ग जीप व पायी जाण्यासाठी आहे. केळीपिंपळगावहून चिचोंडी (नगरमार्ग) ४४ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान देवळापासून आग्नेयेस अंदाजे २०० मीटर अंतरावर ब्राह्मण मोहल्ल्यात उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे बडव्याचे घर होते.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: अहिल्यानगर | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू केळीपिंपळगावहून चिचोंडीला आल्यावर प्रथम बडव्याच्या घरी आले. तेथे गृहप्रवेशाचा कार्यक्रम होता. घराच्या दरवाजाला आडदांडी होती. त्या आडदांडीवर सर्वज्ञांना आसन झाले. मग बडव्याने दहीमिश्रित जोंधळ्याच्या अक्षता लावून सर्वज्ञांची पूजा केली. (उ. ली. २६५, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने