स्थान - T:अहिल्यानगर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 1
वस्ती
नारायणडोह
वस्ती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
नारायणडोह हे गाव, अहिल्यानगर-जामखेड (मांडवा मार्ग) मार्गावर नगरहून आग्नेयेस १० कि.मी. आहे. तसेच नगर-बीड मार्गावरील सारोळा गावापासून नैऋत्येस २ कि.मी. आहे. नगर ते सारोळा १० कि.मी. व चिचोंडी ते सारोळा १० कि.मी. नगर-सोलापूर मार्गावरील दरेवाडीपासून नारायणडोहकडे जाण्याचा मार्ग आहे. नगर ते दरेवाडी दोन कि.मी. आहे. चिचोंडीहून पश्चिमेस नारायणडोह (सांडवे, उकडगाव मार्ग) १० कि.मी. आहे. नारायणडोह येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. नारायणडोहला जाण्यासाठी नगरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान नारायणडोह गावाच्या पूर्वेस अंदाजे २०० मीटर अंतरावर सारोळा रस्त्याच्या दक्षिणेस पूर्वाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात मांडवगणहून नारायणडोहला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (उ. ली. २७५, स्था. पो. शा. खा. द. प्रत) दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ येथून अरणगावला गेले.