मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

मढपिंपरी · अहिल्यानगर · अहिल्यानगर

स्थान - T:अहिल्यानगर D:अहिल्यानगर

स्थान क्र. 1 अवस्थान स्थान मढपिंपरी

अवस्थान स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
मढपिंपरी हे गाव, अहिल्यानगर-सोलापूर मार्गावरील रुईछत्तीसी गावापासून पूर्वेस ४ कि.मी. आहे. तसेच नगर-जामखेड (मांडवा मार्गे) मार्गावरील पिंपळा गावापासून नैऋत्येस ५ कि.मी. आहे. नगर ते रुईछत्तीसी २७ कि.मी. नगर ते पिंपळा २५ कि.मी. नारायणडोह ते पिंपळा १५ कि.मी. नारायणडोहहून दक्षिणेस मढपिंपरी (लोणी सय्यदमीर, कोयाळमार्गे) २४ कि.मी. आहे. हा पायमार्ग होय. मढपिंपरीला जाण्यासाठी नगरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. मढपिंपरी येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान मढपिंपरी गावाच्या पूर्वेस अंदाजे ६०१ मीटर अंतरावर सीना नदीच्या पूर्वकाठी उत्तराभिमुख देवळात आहे. मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. स्थानाच्या उत्तरदक्षिण बाजूचे दोन्ही खांब व देवळाच्या दारसंका नमस्कारी आहेत. हे देऊळ 'महानुभाव श्रीकृष्ण मंदिर' तथा 'महसाहिब' या नावाने ओळखले जाते.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: अहिल्यानगर | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात चिचोंडीहून मढपिंपरीला आले. त्यांचे या ठिकाणी २० दिवस वास्तव्य होते. (उ. ली. २६७, स्था. पो.) २० दिवसांच्या वास्तव्यानंतर ते येथून वाकीला गेले. येथील इतर लीळा : १) नारोबांना वाहाणा घेण्यासाठी पाठविणे. (उ. ली. २६८) २) नारोबांचे 'परिपळ' नाम करणे (उ. ली. २६९)

जवळील इतर स्थाने