स्थान - T:अहिल्यानगर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 2
आसन
मढपिंपरी
पटीशाळेवरील आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
मढपिंपरी हे गाव, अहिल्यानगर-सोलापूर मार्गावरील रुईछत्तीसी गावापासून पूर्वेस ४ कि.मी. आहे. तसेच नगर-जामखेड (मांडवा मार्गे) मार्गावरील पिंपळा गावापासून नैऋत्येस ५ कि.मी. आहे. नगर ते रुईछत्तीसी २७ कि.मी. नगर ते पिंपळा २५ कि.मी. नारायणडोह ते पिंपळा १५ कि.मी. नारायणडोहहून दक्षिणेस मढपिंपरी (लोणी सय्यदमीर, कोयाळमार्गे) २४ कि.मी. आहे. हा पायमार्ग होय. मढपिंपरीला जाण्यासाठी नगरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. मढपिंपरी येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान मठाच्या पूर्वपश्चिम पटीशाळेवर पूर्व बाजूस आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूना येथे आसन होते. त्या वेळी नारोबा १६ दाम घेऊन आले. मग त्यांनी सर्वज्ञांची, १६ दाम अर्पण करून पूजा केली. (उ. ली. २६९, स्था. पो.)